आपली पृथ्वी :- आपली सूर्यमाला 
 
प्रश्न १)मी कोण
१)पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो .
उत्तर - चंद्र

२)मी प्रकाशित आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळे ग्रहांना प्रकाश मिळतो .
 उत्तर - सूर्य

३)मी स्वतः भोवती , ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवती ही फिरतो .
उत्तर - उपग्रह

४)मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवती ही प्रदक्षिणा घालतो .
उत्तर - ग्रह

५)माझ्यासारखी  सजीव सृष्टी इतर कोणत्या ग्रहावर नाही .
उत्तर - पृथ्वी

६)मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे .
उत्तर -सूर्य

प्रश्न २)व्याख्या लिहा
१)सूर्यमाला -
               सूर्य हा तारा व त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांनाएकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात .सूर्यमालेत उपग्रह लघुग्रह व बटुग्रह यांचाही समावेश होतो .

२)बटुग्रह -
            प्लुटोया खगोलीय वस्तू ला बटुग्रह म्हणतात .बटू ग्रहांना स्वतःची कक्षा असुन ते स्वत सूर्याभोवती स्वतंत्रपणे प्रदक्षिणा घालतात .

३)अवकाश - 
            ग्रह तारे यांच्या दरम्यान असणाऱ्या रिकाम्या जागेला अवकाश असे म्हणतात .

४)परिभ्रमण कक्षा -
                      एखाद्या खगोलाच्या सूर्याभोवती फिरणाच्या मार्गाला त्याची परिभ्रमण कक्षा असे म्हणतात .

५)लघुग्रह -
         मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान असणाऱ्या पट्ट्यातील  खगोलीय वस्तूं ना लघुग्रह म्हणतात .
 
प्रश्न ३ .पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा .
१)अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात ?
उत्तर - अवकाश यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र वापरले जाते यासाठी शक्तिशाली रॉकेट किंवा अग्निबाण वापरले जातात या अग्निबाण आत प्रचंड प्रमाणात इंधन जाळली जातात अनेक टन वजनाच्या अवकाश यानांची प्रक्षेपण पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अशा रॉकेट ची गरज असते म्हणून अवकाश प्रक्षेपणासाठी रॉकेट वापरतात .

२)कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात ?
उत्तर - कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने पृथ्वी पासून लांब अंतरावर असणाऱ्या वस्तूंचे निरीक्षण करता येते अशा निरीक्षणावरून पर्यावरण हवामान पृथ्वीवरील पाणी खनिजे यांची जागा अशी माहिती मिळवता येते .या माहितीच्या आधारे नकाशे तयार करता येतात तसेच संदेशवहनही करता येते .

प्रश्न ४ .सूर्यअचानक गडप झाला तर ,आपल्या सूर्यमालेचे काय होईल ?
उत्तर -सगळीकडे अंधार होईल .झाडे मरून जातील कारण त्यांना अन्न निर्माण करता येणार नाही .ऋतू बदलणार नाही.पाऊस पडणार नाही  कारण सूर्याची उष्णता न मिळाल्याने पाण्याचे वाफेत रूपांतर होणार नाही. दिन रात्रीचे चक्र संपेल .

प्रश्न ५ .लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे . ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे .आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ? 
उत्तर -लघुग्रहाचा मार्ग बदणे येईल हा उपाय करता येईल 
          लघुग्रहाचा मार्ग बदलण्यासाठी छोट्या क्षेपणास्राने  त्याला धक्का देता येईल. 
  लघुग्रहावर जाऊन त्याचा विस्फोट करून तो नष्ट करता येईल
लेझर किरणांच्या साहाय्याने लघुग्रहांवरच्या  पदार्थांचे बाष्पीभवन करून त्याचे वस्तुमान बदलता येईल वस्तुमान बदलामुळे देखील लघुग्रहाचा मार्ग बदलले


Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post