१०० दिवस वाचन अभियानाअंतर्गत
आठवडा १०
स्थानिक भाज्यांसाठी फळे शोध :
२०२१ वर्ष संयुक्त राष्ट्रांनी फळे आणि भाज्यांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे
विद्यार्थ्यांना स्थानिक फळे व भाजीपाला यांचे वाण आणि विशेष वैशिष्ट्यविषयी आठवडाभरात माहिती शोधायची आहे, कालावधीदरम्यान विज्ञान शिक्षक गोळा केलेल्या माहितीची तपासणी करतात व अधिक माहिती देतात
आपल्या परिसरात अळू, घेवडा, वांगे .बटाटा ,गवार, काकडी, कारले, कोथिंबीर ,कोबी, गाजर, टोमॅटो, शेवगा, भोपळा, वाटाणा, मिरची, तोंडली, यांसारखा अनेक भाजीपाला आपल्या परिसरातील शेतकरी शेतात घेता .
वांगे
भाजी | वांगे |
नाव | वांगे , Brinjal, Eggplant,बैंगन |
काळ | वांगे वर्षभर येते . |
जाती | प्रगती, अरुणा, वैशाली, मांजरी गोटा, पुसा क्रांती, पुसा जांभळी गोल, पुसा जांभळी लांब या आहेत. |
हवामान | वांग्याला कोरडे आणि उष्ण हवामान चांगले असते . |
लागवड | गादीवाफे किंवा सरीवर लागवड करतात . |
जमीन | मध्यम काळी जमीन वांग्यासाठी चांगले असते . |
रोग | वांग्यावर बोकड्या, मर यांसारखी रोग होतात तसेच शेंडा आणि फळ पोखरणारी आळी होते |
कसे खातो | वांग्याची भाजी , वांग्याचे भरीत , भरलेले वांगे |
टोमॅटो
टोमॅटो ही भाजी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते . टोमॅटोमध्ये अ ब आणि क जीवनसत्त्वे असतात त्यासोबतच लोह असते . टोमॅटो वर्षभर घेतले जाते टोमॅटो हे शेतकऱ्याचे उत्पन्नाचे खूप मोठे साधन आहे
भाजी | टोमॅटो |
नाव | टोमॅटो टमाटर, Tomato, Solanum lycopersicum |
काळ | टोमॅटो वर्षभर येते . |
जाती | रूपाली , वैशाली, भाग्यश्री, पुसा रुबी , पुसा गौरव, चेरी , धनश्री रोमा या जाती आहेत. |
हवामान | वांग्याला कोरडे आणि उष्ण हवामान चांगले असते . |
लागवड | गादीवाफे मल्चिंग पेपर टाकून किंवा सरीवर लागवड करतात . |
जमीन | मध्यम ते भारी जमिन टोमॅटोसाठी उत्तम असते |
रोग | भुरी आणि करपा यांसारखे रोग होतात |
कसे खातो | टोमॅटोपासून भाजी टोमॅटो चटणी बनवली जाते. त्यासोबतच सॉस, केचप ,जॅम, ज्यूस, मध्ये टोमॅटो चा उपयोग केला जातो |
Post a Comment
THANK YOU