पृथ्वीचे फिरणे

प्रश्न १ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .
१) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास            परिवलन        म्हणतात .

२) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास            परिभ्रमण      म्हणतात .

३) पृथ्वीच्या परिवलनामुळे     दिवस       व
 रात्र          होतात .

प्रश्न २ .कशाला म्हणतात ?

१) पौर्णिमा -
             आकाशात पूर्ण चंद्र दिसतो ,म्हणजेच चंद्राचा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौणिमा म्हणतात .

२) अमावास्या -
        आकाशात चंद्र दिसत नाही , म्हणजेच चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या रात्रीला अमावास्या म्हणतात .

३) चांद्रमास -
          एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंत २८ ते ३० दिवसांच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात .

४) तिथी -
      अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पोर्णिमे पासून अमावास्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात .

प्रश्न ३ . पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१) ' विषुववृत्त ' म्हणजे काय ?
उत्तर - पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवांच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात . 

२) विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते ?
उत्तर - विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग निर्माण होतात . त्यांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात .

प्रश्न ४ . जरा डोके चालवा .
१) पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात ?
उत्तर - पृथ्वीचे एक परिवलन पूर्ण होण्यास एक दिवसाचा कालावधी लागतो व परिभ्रमणास ३६५ दिवस व ६ तास लागतात . पृथ्वीच्या एका परिभ्रमणात ३६५ पूर्ण परिवलने आणि एक , एक - चतुर्थांश परिवलन होते .

२) अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे . पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योद्याचा क्रम त्यापुढे लिहा
मुंबई ( महाराष्ट्र ) , कोलकाता (पश्चिम बंगाल ) , भोपाळ (मध्यप्रदेश) , नागपूर ( महाराष्ट्र )
उत्तर - पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे पूर्वेकडील राज्यांत प्रथम सुर्योदय होईल म्हणून सुर्योदयाचा योग्य क्रम पुढीलप्रमाणे 
१) इटानगर ( अरुणाचल प्रदेश ) २) कोलकाता (पश्चिम बंगाल ) ३) भोपाळ ( मध्य प्रदेश ) ४) नागपूर ( महाराष्ट्र ) ५) मुंबई ( महाराष्ट्र )

प्रश्न ५ . काय करावे बरे ?

१) अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे . आजीला थंडीचा त्रास होतो , तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे ?
उत्तर - ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे . २३ सप्टेंबर ते २२ मार्च उन्हाळा असतो त्यामुळे अमितच्या आजीला या काळात ऑस्ट्रेलियाला जाता येईल . २२ मार्च ते २३ सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये कारण तेथे हिवाळा असतो .

२) आपल्या देशात चंद्राच्या कलांप्रमाणे निरनिराळे सण साजरे केले जातात निरनिराळ्या धर्मांतही चंद्राच्या कलांना महत्त्व आहे . अशी दहा सणांची नावे सांगा .
उत्तर - रामनवमी , गोकुळाष्टमी , विजयादशमी , नागपंचमी , आषाढी एकादशी , ईदे मिलाद , महावीर जयंती , नरक चतुर्दशी , धन त्रयोदशी , रथसप्तमी .

3 Comments

THANK YOU

  1. 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😚😘😍😙😔😔😖😙😍😛😚😪😙😙😙😞😷😷😟😞😞😞😒😒😙😙😗😗😙😙😘😘😘

    ReplyDelete
  2. Very good best thanks 😍😍🥰🤩🤩

    ReplyDelete

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post