कठीण समय येता ....


प्रश्न १ .का ते सांगा
१)पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडून मग ते तरुण गाडीवाला कडे वळले ;
उत्तर - कारण मुक्या जनावरांना आपल्या वेदना सांगता येत नाही व त्यांच्यावर मजुरांचे पोट अवलंबून असते .

२)गाडीवान व्याकुळ होऊन गाडी भोवती फिरत होता ;
उत्तर - कारण त्याच्या बायकोचा ठावठिकाणा लागत नव्हता तो तिला शोधत होता .

३)मोटारसायकल वरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला ;
उत्तर - कारण त्यांना खड्ड्यात पडलेल्या मुळ्या उचलण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत हवी होती .

४)गाडीवाला ची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती ;
उत्तर - कारण अपघातानंतर आई खड्ड्यात निपचित पडली होती .

प्रश्न २ .तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा .
१)गाडीवाला ची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली , हे त्यांचे दोन तरुणांनी कसे ओळखले असेल ?
उत्तर - उसाच्या गाडीच्या अपघातात गाडी एका बाजूला कललेली असताना गाडीवान गाडी भोवती फिरताना पाहिला .त्याची बायको कुठे दिसत नव्हती .त्यामुळे गाडी बनायची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली असेल असे त्या दोन तरुणांना वाटले .

२)शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले ?
उत्तर - अपघात पाहिलेल्या एका तरुणाने शाळेत गुरुजींना अपघाताविषयी कळवले व हात जोडून गुरुजींकडे विद्यार्थ्यांची मदत मागितली .एका मुलाने एक मुळीच रुचली तरी बाईचा जीव वाचेल ही त्याची विनवणी गुरुजींना कळाल्यामुळे ते लगेच विद्यार्थ्यांना घेऊन घटनास्थळाकडे निघाले .

३)गाडीवानाला हुंदके का आवडत नव्हते ?
उत्तर - अपघातामध्ये त्यात दोन तरुणांनी व विद्यार्थ्यांनी बाईचा जीव वाचवला परंतु कर्ज व उसनवारीने असलेल्या गाडीवानाला भविष्याची काळजी वाटत होती . पण जेव्हा कारखान्यातील अधिकाऱ्यांनी त्याला दवाखान्याच्या खर्चाची व त्याच्या कामाची हमी  दिली तेव्हा गाडीवानाच्या डोळ्यात अश्रू आले .

प्रश्न ३ .पाठातील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा .
१)कच्चे X  पक्के

२) उतार x  चढण

३)आडवी X  उभी

४)खाली X  वर

५)लवकर X  उशिरा

६)मागे X  पुढे

७)वरून X  खालून

८)सरळ X  वाकडे

९)उतरले X  चढले

१०)प्रसिद्ध X  अप्रसिद्ध

११)रात्र X  दिवस

१२)बाहेर X  आत

१३)स्वच्छ X  अस्वच्छ

१४)जिवंत X  मृत

१५)पूर्ण X   अपूर्ण

१६)मोठ्या X  छोट्या

प्रश्न ४ .पुढील शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिहा .
१)बाईक -  मोटारसायकल

२)प्लीज -  कृपया

३) शॉक बसणे -  धक्का बसणे

४)फॅक्चर -  हाड मोडणे

५)ॲम्बुलन्स -  रुग्णवाहिका .

प्रश्न ५ .वाक्यांत उपयोग करा .
१)प्रसंगावधान राखणे -  
वाक्य -  तुटलेला रेल्वे पूल पाहून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला .

२)काळजात धस्स होणे -
वाक्य - रस्त्यावर भला मोठा साप पाहून सुधीरच्या काळजात धस्स झाले .

३)भेदरलेल्या नजरेने पाहणे - 
वाक्य - इमारतीला लागलेली आग पाहून दवाखान्यातील लोक भेदरलेल्या नजरेने ती इकडे तिकडे पाहू लागले .

४)हायसे वाटणे - 
वाक्य - बाहेरगावी गेलेल्या मुलाला माघारी आलेले पाहून आईला हायसे वाटले .

५)डोळे पाणावणे -
वाक्य - शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जाताना राजवीरचे डोळे पाणावले .

६)प्रसंगाचे गांभीर्य जाणणे - 
वाक्य -पसरलेली रोगराईया प्रसंगाचे गांभीर्य पाहून सरकारने गरिबांना मदतीचा हात दिला .

७)मार्गी लावणे -
वाक्य - लग्नसमारंभात पाहुण्यांचा आदरसत्कार करून त्यांना मार्गी लावले .

८) निपचीत पडणे -
वाक्य - तापाने फणफणलेला सुहास निपचीत पडून राहिला .

९)ठावठिकाणा नसणे -
वाक्य - सुट्टीच्या दिवशी मुलांचा कोठेही ठाव ठिकाणा नसतो .

प्रश्न ६ .पुढील संवाद वाचा अधोरेखित केलेल्या शब्दांकडे विशेष लक्ष द्या .
बंडू :सुट्टीत मी मामाकडे गेलो होतो .
लता :आम्ही नाही गेलो कुठेही !
बंडू :मग तू सुट्टीत काय केलंस ?
लता :माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत .
मिनू : तिला वाचायला आवडतं .
लता :तुला नाही का आवडत ?
मिनू :मला पण आवडतं ना !
बंडू :गुरुजींनी आपल्याला वाचनाचं महत्त्व    सांगितलं .
लता :हे पटलंय  आम्हाला .
मिनू :आपण सारे वाचूया .
लता :चांगले वाचक बनूया .

प्रश्न ७ .या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा .
उत्तर -त्याची , ती ,त्या ,त्यांनी ,तिला , ते , ज्या , तिच्या , तो , तुला .

प्रश्न ८ . योग्य पर्यायी उत्तर निवडा .
१ )पुढील वाक्यात किती सर्वनामे आली आहेत ?
वाक्य -ज्या दोन  तरुणांनी मदत केली ते तरुण पत्रकार होते .
१)चार २)तीन ३) दोन ४)एक
उत्तर - दोन

२)पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा .
वाक्य -तिथला अपघात कोणी पाहिला ?
१)तिथला  २)पाहिला ३)अपघात ४)कोणी
उत्तर -कोणी

३) ' बैलगाडी उताराला लागली 'या वाक्यातील बैलगाडी यांना ऐवजी कोणते सर्वनाम येईल ?
१) ती २) तो ३)ते ४)हा
उत्तर - ती

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post