सावरपाडा एक्सप्रेस:कविता राऊत

सावरपाडा एक्सप्रेस:कविता राऊतटेस्ट सोडवा प्रश्न १ . एका वाक्यात उत्तरे लिहा .
१) कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला ?
उत्तर - कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताचा दबदबा निर्माण केला .

२) कविताचे पाय कशामुळे कणखर बनले ?
उत्तर - कष्टांने भरलेल्या अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले .

३) कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले ?
उत्तर - कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले .

४) कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही ?
उत्तर - आईला उगीच वाईट वाटेल , म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही .

५) कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते ?
उत्तर - कविता पी .टी . उषा या धावपटूला आदर्श मानते .

६) कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते ?
उत्तर - शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती कोणत्याही खेळाडूसाठी महत्वाची असते .

प्रश्न २ . दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
१) कविता राऊत ला 'सावरपाडा एक्स्प्रेस ' का म्हणतात ?
उत्तर - कविता धावपटू म्हणून राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धांतून सावरपाडा सारख्या दुर्गम भागातून नावारूपाला आली त्यामुळे तिला 'सावरपाडा एक्स्प्रेस ' म्हणतात .

२) कविताला कशामुळे दिलासा मिळाला ?
उत्तर - चीनमधील गुआंगजऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्याच्या स्पधेत कविताचे सुवर्णपदक एका सेकंदाने हुकले होते .त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजून काढली यामुळे कविताला दिलासा मिळाला .

३) कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली ?
उत्तर - सुरुवातीच्या काळात कविता नाशिक येथे धावण्याचा सराव व हरसूल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती यातून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावी साठी भोसला मिलिटरी कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिचा राहण्याचा प्रश्न देखील सोडवला .

४) हरसूल - सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो ?
उत्तर - कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हरसूल - सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे तिच्या यशामुळे गावाचे नाव सर्वत्र झाले .  तिच्यामुळे गावाला प्रसिद्धी मिळाली म्हणून या परिसराला कविताचा अभिमान वाटतो .

५) आपली लेक खूप मोठी झाली आहे ,  असे सुमित्राबाईंना का वाटते ?
उत्तर - दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा जिंकल्या नंतर कविता गावी येणार होती . तिचे कौतुक करण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते . आपल्या मुलीची कीर्ती , सत्कारासाठी येणाऱ्या आलिशान गाड्या , पत्रकार हे सारे पाहून आपली लेक मोठी झाली असे सुमित्राबाईंना वाटले .

६) कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात ?
उत्तर - कविताला शालेय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला त्यावेळी प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी कविताच्या पायांमधली दौड ओळखली होती.

७) कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल ?
उत्तर - कठीण परिश्रम केल्याशिवाय आपल्याला ध्येयापर्यंत पोहचता येणार नाही त्यामुळे चिकाटीने प्रयत्न केला पाहिजे .

प्रश्न ३) पुढीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा .
१) पण - वेगळेपण , शहाणपण

२) दार - चमकदार , तजेलदार

३) पणा - कमीपणा , मोठेपणा

४) पणी - लहाणपणी , मोठेपणी

५) इक - आर्थिक , रासायनिक

६) इत - अखंडित , सदोदित

प्रश्न ४) पुढील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा .

१) दिलासा मिळणे - 
                             कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमाफीने काहीसा दिलासा मिळाला . 

२) गराडा घालणे - 
शिक्षक मैदानावर खेळ घेण्यासाठी येताच मुलांनी त्यांना गराडा घातला .

३) कणखर बनणे -
                        लहान पणापासुन शेतात कष्ट केल्याने रामूचे शरीर कणखर बनले .

४) ओढाताण होणे -
                      आई गावी गेली असताना स्नेहाची शाळेत जाण्यासाठी ओढताण झाली .

५) नात्यातली वीण गहिरी असणे -
                                  रामू आणि शामू या भावांच्या नात्यातली वीण गहिरी आहे .

६) वणवण सहन करणे -
                              मेंढ्यापाठी मेंढपाळाला ऊन पावसाची वणवण सहन करावी लागते.

प्रश्न ५) समान अर्थाचे शब्द लिहा .

१) माय - माता , आई

२) लेक - मुलगी

३) बळ - शक्ती

४) गहिरे - खोल 

५ ) क्रीडा -  खेळ

६) वडील - बाप

प्रश्न ६) पुढील वाक्यांतील  अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दांत सांगा .

१) तुमचे गल्ली /गाव कशाने वेढलेले आहे ?
उत्तर - गावाच्या भोवती काय आहे ?

२) आपल्या राज्यातली अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत .
उत्तर - शहरात धुराचे प्रमाण जास्त आहे .

३) अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत .
उत्तर - सिमेंटच्या इमारतींनी वेढलेले .

४) कार्यालयात अनिता मॅडम नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात .
उत्तर - अनिता मॅडमच्या अवतीभवती नेहमी खूप फायली असतात .


प्रश्न ७ ' शरीर ' या शब्दापासून ' शारीरिक ' हा शब्द तयार झाला आहे . तसेच पुढील शब्दांपासून तयार झालेले शब्द वाचा व समजून घ्या .

   उत्तर - उद्योग - औद्योगिक ,
             शिक्षण - शैक्षणिक , 
              बुद्धी - बौद्धिक ,
              नीती - नैतिक ,   
              संस्कृती - सांस्कृतिक , 
               भूगोल - भोगोलिक   , 
              इतिहास - ऐतिहासिक , 
               विज्ञान - वैज्ञानिक

स्वाध्याय व्हिडिओ पहा 2 Comments

THANK YOU

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post