वल्हवा  रं  वल्हवा


प्रश्न १.कवितेच्या ओळी पूर्ण करा .
१)       नौका   चाले कशी जलावरी - जलावरी जलावरी ,

२)    झेंडा         माथ्यावर तीन रंगी - तीन रंगी

३)         जोसानं        नाव आता वल्हवा रं - वल्हवली ।

४) रोखील      वादळ        वल्हवा रं - वल्हवली ।

प्रश्न २) एका वाक्यात उत्तरे लिहा .
१) कवी आपली शक्ती कशी आहे असे म्हणतो आहे ?
उत्तर - आपली शक्ती वादळाला रोखील अशी आहे .

२) लाटा केवढ्या आहेत ?
उत्तर - लाटा डोंगराएवढ्या आहेत .

३) आपली मोलाची दौलत कोणती ?
उत्तर - देशाचे स्वातंत्र्य ही आपली मोलची दौलत आहे .

४) काय पाहून अंगात नवीन जोम निर्माण होतो ?
उत्तर - आपला तिरंगा फडकताना पाहून अंगात नवीन जोम निर्माण होतो .

प्रश्न ३ समानार्थी शब्द लिहा .
१) भार -       वजन

२) नाव -     होडी

३) दौलत -      संपत्ती

४) जोम -      शक्ती

प्रश्न ४ कवितेतील नादमय शब्द लिहा .
उत्तर -  लहान - महान
            वीर - धीर
           मोकाट - पिसाट
           जलावरी - मुलांवरी
            डोले - बोले
             आस - ध्यास
            मोलाची - तोलाची

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post