बाकी वीस रुपयांचं काय ?
प्रश्न १ .तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा .
१)साहेबांनी विकासकडे राजू बाबत कोणती तक्रार केली ?
उत्तर -राजू शंभर रुपये घेऊन पाण्याची बाटली आणण्यासाठी गेला तो आलाच नाही .राजूने मला यांची रुपयांना फसवले . त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयात पडली अशी तक्रार साहेबांनी विकास कडे केली .
२)दवाखान्यात राजुला पाहून विकासची उत्सुकता का वाढली ?
उत्तर -राजूची आई दवाखान्यात दाखल होती राजू आई जवळ असताना एकदा विकास नेत्याला पाहिले तेव्हा राजूच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती त्यावर ' उरलेले अन्न ' देण्याचे आवाहन केले होते .त्याच्या हातात एक पिशवी होती त्या पिशवीत अन्न असावे असे विकासला वाटत होते अशा स्थितीमध्ये राजू दिसल्यामुळे ची उत्सुकता वाढली .
३)दवाखान्यात फिरताना राजुच्या काय लक्षात आले ?
उत्तर - आईसोबत दवाखान्यात राजू असताना त्याच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले लोक गरीब आहेत .ते भुकेने व्याकूळ होऊन पैशासाठी अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात .उलट दुसरे काही लोक जेवून उरलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात .
४)भुकेलेल्यासाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला ?
उत्तर -दवाखाना राजूने एक घेतला त्यावर 'उरलेले अन्न फेकू नका मले द्या मी ते उपाशी लोकायले देतो 'असे लिहिले दोरी बांधून गळ्यात अडकवलागळ्यातली पाटी वाचून लोक उरलेले अन्न राजुला देऊ लागले बरेच अन्नाचा माहु लागले ते जमा झालेले अन्न राजू गरजूंना देऊ असे भुकेलेल्यांना साठी राजू ने हा उपक्रम सुरू केला .
५)साहेबांचा राजू बद्दलचा गैरसमज कसा दूर झाला ?
उत्तर - साहेबांचे शंभर रुपये घेऊन पाण्याची बाटली आणली नाही म्हणून साहेबांचा त्याविषयी गैरसमज निर्माण झाला होता परंतु राजूच्या मित्राने साहेबांना पाण्याची बाटली तर दिली पण राजूने त्याच्याकडे दिलेले शंभराची नोट दिली आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला आहे साहेबांना कळले पण जाता जाता राजूने प्रामाणिकपणे त्यांचे शंभर रुपये दिले हे पाहून गैरसमज दूर झाला .
प्रश्न २ .तुमच्या मनाने उत्तर लिहा .
१)इतरांच्या वस्तूला हात लावू नकोस असे आईने राजूला का म्हणाली असेल ?
उत्तर - राजूचा प्रामाणिकपणा आईला माहीत होता परंतु नकळत त्याच्या हातून काही गैर व्हायला नको म्हणून कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजुला सांगितले असावे .
२) ' माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे 'असे साहेब विकासला का म्हणाले असतील ?
उत्तर -शंभर रुपये घेऊन बाटलीन आणल्यामुळे साहेबांचा राजू बद्दल गैरसमज झाला होता त्यामुळे ते राजू बद्दल वाईट बोलले होते पण राजूचा प्रामाणिकपणा लक्षात आल्यावर त्यांना स्वतःची चूक कळली .विकास ने मात्र राजू चे अंतर्गत गुण ओळखले होते त्यामुळे माणसं ओळखण्यातला 'तुमचा अधिकार मोठा आहे 'असे साहेब विकासला म्हणाले असतील .
३)भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल ?
उत्तर -लग्न समारंभात अन्नाची खूप नासाडी होते अशा ठिकाणी अन्नाचे नियोजन केले पाहिजे .ज्यांच्याकडे खूप अन्न आहे त्यांनी एक वेळचे जेवण भुकेलेल्यांना दिले तर ही समस्या थोड्या प्रमाणात सुटेल .अन्नाची नासाडी करणाऱ्या लोकांचे प्रबोधन करता येईल .
४)तुम्हाला राजू शी मैत्री करायला आवडेल का ?का ते सांगा .
उत्तर -राजूशी मैत्री करायला आवडेल आणि दुसऱ्याला मदत करण्यास तत्पर आहे तसेच तो बुद्धिमान असून देखील स्वभावाने गरीब आहे .
५)राहिलेल्या वीस रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते ?
उत्तर -राहिलेले वीस रुपये खर्च न करता वाचून गरिबांसाठी खर्च करावा .अशी बचत वर्षभर केली तर गरजू लोकांची मदत होईल .
६)राजू प्रामाणिकपणा कोणकोणत्या प्रसंगातून दिसून येतो ?
उत्तर - राजू आईसोबत दवाखान्यात तिची सेवा करायचागरजू भुकेल्या लोकांसाठी राजूने अन्न गोळा करण्याची उपक्रम राबवला साहेबांचे शंभर रुपये व पाण्याची बाटली राजूने मित्राकडे पाठवली .
प्रश्न ३ . फसवाफसवी ,कचराकुंडी 'गोरगरीब यांसारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा .
उत्तर -कामधंदा ,ताटवाटी , भांडीकुंडी,कामधंदा
प्रश्न ४ . पुढील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा .
१)फाईल - नस्ती
२)सेंटर - केंद्र
३)पेशंट - रुग्ण
४)विंग - विभाग
५)हॉटेल - उपहारगृह
६)कॅन्सर - कर्करोग
प्रश्न ५ .पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा .
१)महाबिलंदर -
वाक्य - बाजारामध्ये नेहमी फसवाफसवी करणारा महाबिलंदर माणूस आहे .
२)आवाहन -
वाक्य -पूरग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासनाने मदतीचे आवाहन केले .
३)अनुभव शून्य -
वाक्य - जुन्या परंपरांच्या बाबतीत आत्ताची पिढी अनुभव शून्य आहे .
४)निरुत्तर -
वाक्य - खोटे बोलणारा राजू चोरी पकडली गेल्याने निरुत्तर झाला .
प्रश्न ६ .भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक भारी हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता ?हा शब्द वापरून तीन चार वाक्य लिहा .
उत्तर - आमच्या घरातला राजवीर भारी खोड्या करतो पण त्याने शाळेत भारी कार्य केले .पावसाळ्यात नदीला भारी पूर आला होता तेव्हा त्याने खूप लोकांची मदत केली शिक्षकांनी त्याला भारी शब्बासकी दिली .
प्रश्न ७ .पैसा याची सामान्य रूपे पैशाला , पैशाने ,पैशांसाठी , पैशाचा , पैशांतून , पैशातला , या प्रमाणे पुढील शब्दांची सामान्य रूपे लिहा .
१)मासा - माशाला ,माशांचा ,माशासाठी ,माशाने
२)ससा -
सशाला ,सशांचा ,सशासाठी ,सशाने .
३)ठसा -
ठशाने ,ठशांचा , ठशांसाठी , ठशाला
प्रश्न ८ .पुढील शब्दांना की , ई , ता , वा , पणा, आई , हे प्रत्यय लावून भाववाचकनामे तयार करा .
१)सुंदर - सुंदरता
२)प्रामाणिक - प्रामाणिकपणा
३)नवल - नवलाई
४)गोड - गोडवा
५)दांडगा - दांडगाई
६)शांत - शांतता
७)पाटील - पाटीलकी
८)चपळ - चपळाई
प्रश्न ९ .पुढील भाववाचक नामाचे विरुद्धार्थी शब्द लिहा .
१)मित्रत्व x शत्रुत्व
२)गरिबी x श्रीमंती
३)खरेपणा x खोटेपणा
४)महागाई x स्वस्ताई
प्रश्न १० .पुढे दिलेल्या शब्दांचा सारखे अन्य शब्द लिहा
१)मनुष्यत्व - प्रभुत्व ,देवत्व
२)आपुलकी - बांधिलकी ,पाटीलकी
३)नम्रता - सुंदरता ,शालीनता
४)नवलाई - चपळाई ,रजाई
५)बालपण - लहानपण ,शूरपण
६)माधुर्य - सौंदर्य ,कार्य
is ok
ReplyDeleteBsd
Deleteamaizing
ReplyDeleteव्यव्सय्मला चा स्वध्याय पाठवा
ReplyDeletePost a Comment
THANK YOU