पण थोडा उशीर झाला ....
प्रश्न १ .दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
१)लेखकाला सैनिकांच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते ?
उत्तर - अतिशय हवामानाच्या दुर्गम प्रदेशातीलठिकाणी सेवा बजावणी हे सैनिकाच्या आयुष्यातले प्रचंड अवघड काम असते .अतिशय थंड हवामान व सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल स्थितीत हीसेवा करायची असते म्हणून ते प्रचंड अवघड काम असते .
२)पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड उडत असे ?
उत्तर -सैनिक आपल्या गावापासून खूप दूर 1ते असल्यामुळे प्रत्येकाला गावची व घराची ओढ असायची पत्र त्यांना गावाकडच्या माहिती व दिलासा देत असेआठ-पंधरा दिवसांतून एकदा पोस्टमन आला की गावची खुशाली कळावी म्हणून बटालियनमध्ये सैनिकांची झुंबड उडत असे .
३)गावाकडचा सांगावा एकूण लेखकाची अवस्था कशी झाली ?
उत्तर - गावाकडून सुखदेवे आणलेला सांगावा लेखकाची आई खूप आजारी होती आईने त्याला निरोप पाठवला होता तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता त्याचे मन ढसढसा रडत होते डोळ्यांत एक सारखे अश्रू ओघळत होतेलेखकाचा जीव घाबराघुबरा होऊन मन सैरभैर झाले .
प्रश्न २)का ते लिहा .
१)कारगिलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायक वाटत .
उत्तर - कारगिलमधील पावसाळा व हिवाळा जीवघेणा असतो .परंतु उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या गार रंगाने नटून जातात .धरतीने हिरवागार शालू परिधान केला आहे .अशा रमणीय निसर्गामुळे लेखकाला कारगिलमधील उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायक वाटतो .
२) लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे .
उत्तर -लेखकाच्या पत्नीने अंतर्देशीय पत्र पाठवले होते त्यात मजकूर नव्हताचपत्नीच्या अश्रूंचे सुकलेले डाग होतेलिखाना शिवाय त्याला घरची परिस्थिती समजली मजकूरा विना ते पत्र खूप काही बोलुन गेले .
३)गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटले .
उत्तर -आईच्या आजारपणाची बातमी सुखदेव कडून समजतात सामानाचा पसारा आवरून लेखक गावाला जायला निघाला प्रवास दहा दिवसांचा होता प्रवासातला वेळ सरता सरत नव्हता असे लेखकाला झा ले होते तिच्या मायेच्या स्पर्शासाठी तो असुसलेला होता . अस्वस्थ मनस्थिती मुळे गावाला जाताना रस्ता कटत नव्हता .
४)पण थोडा उशीर झाला .... असे लेखकाने म्हटले आहे .
उत्तर -आजारी आईला पाहण्यासाठी जेव्हा लेखकांनी गावात प्रवेश केला तेव्हा सगळे गावकरी कावरेबावरे होऊन त्याकडे पाहू लागले .लेखक हातातील टाकून घराच्या दिशेने धावले वाड्याच्या दरवाजात बहिणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागले . सर्व भाऊबंद माना खाली घालून बसले होते .लेखकाची नजर आईला घरभर शोधत होती . लेखकाला जाणीव झाली की यापुढे कधीच दिसणार नव्हती म्हणून थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे .
प्रश्न ३ .वसुंधरेचे व सैनिकांच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हाला आवडलेले वाक्य शोधून लिहा .
उत्तर - वसुंधरेचे वर्णन -उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्याकंच रंगाने नटून जातात .जमीन अशी दिसतच नाही ;जणू हिरवागार शालू परिधान केला आहे .
सैनिकांच्या मनाचे वर्णन -निसर्ग सैनिकांचे मन उल्हासित करायचाआलेली पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकांचं मन चंद्रमणी यासारखं बाथरूम कधी व हू लागायचं ते समजायचं नाही
प्रश्न ४ .कारगिल या ठिकाणाचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा
प्रश्न ५ .सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते .
उत्तर - आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी एकोप्याने राहणे .राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे .देशाचा सुजाण नागरिक होण्याचा प्रयत्न करणे .
प्रश्न ६ .मन शब्द असलेले पाठातील वाक्प्रचार लिहा .
उत्तर - मन उल्हासित होणे ,मन चंद्रमण्यासारखे पाझरणे ,मन सैरभैर होणे ,मन हेलावणे ,मन आतुरणे .
प्रश्न ७ . ' पाव्हणेरावळे 'यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा .त्या जोड शब्दांचा वाक्यात उपयोग करा .
१)भांडीकुंडी -
लहान मुली भांडीकुंडी हा खेळ खेळतात .
२)केरकचरा -
वाक्य -शाळेला खूप दिवस सुट्टी असल्याने शाळेत खूप केरकचरा झाला .
३)कावराबावरा -
वाक्य -शाळेच्या पहिल्या दिवशी रमेश कावराबावरा झाला .
प्रश्न ८ .तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी प्रश्न तयार करा .
उत्तर -प्रश्न - १)सैनिक होण्याची प्रेरणा तुम्ही कोणापासून घेतली ?
२)तुम्ही सैन्यात भरती झाल्यावर तुमच्या आईची प्रतिक्रिया काय होती ?
३)सैनिकाचे प्रशिक्षण घेताना तुम्हाला त्रास झाला का ?
४)तुम्ही देशासाठी काम करता याचा अभिमान वाटतो का ?
५)तुम्ही देशातील तरुण पिढीसाठी कोणता संदेश द्याल ?
६)सैनिकाच्या कर्तव्यावर असताना कुंटुंबाची आठवण येते का ?
Thanks
ReplyDeleteThank you so much
ReplyDeletePost a Comment
THANK YOU