जनाई

प्रश्न १ .एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)जनाई शेतात कोणते काम करीत होती ?
उत्तर - पाटाच्या पाण्याचा प्रवाह बदलून संपूर्ण शेतातील ऊसाला पाणी देण्याचे , म्हणजेच दारे मोडण्याचे काम जनाई शेतात करीत होते .

२)शेंगाच्या वावरातून जाताना आलेला आवाज एकूण जनाईला काय वाटले ?
उत्तर - शेंगाच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान चालल्यासारखे वाटले .

३)जनाई का घाबरून गेले ?
उत्तर - वावरात जनाईला साफ दिसल्यामुळे ती घाबरून गेली .

४)जनाई ला शेतात का जावे लागणार होते ?
उत्तर -शेतात राबल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते ; म्हणून तिला शेतात जावे लागणार होते .

प्रश्न २ .पाठात आलेल्या गोष्टींचे लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केले आहे .त्यांच्या जोड्या जुळवा .
'अ ' गट                     '  ब ' गट
१)शेंगांचे वावर -   हिरवागार शालू
२)शेंगांना आलेली 
   पिवळी फुले   -    हिरव्यापिवळ्या रेशमी     
                          धाग्यांचा रुमाल

३)साप           - काळ्या ठिपक्यांची चार
                      वाव तुळी

४)जेवण करून पोट भरले - डर्रकन दोन ढेकर 
                                      आले 

५ ) जाड धाटं -      मनगटा सारखी धाटं

प्रश्न ३ .दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा .
१)जनाई चे अंग भगभगत होते कारण -
अ)तिने खूप काम केले होते .
ब)उसाच्या पाल्यानं तिचं अंग कापले होते .
क)तिला झोप आली होती .
उत्तर -उसाच्या पाणी आणून तिचं अंग कापले होते .

२)जनाई वावरातून पळत सुटली , कारण -
अ)तिला आकाशात विमान दिसले .
आ)तिच्या अंगावर साप धावून आला .
इ )तिचे काम संपले .
उत्तर - तिच्या अंगावर साप धावून आला .

प्रश्न ४ .पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा .
१)रात्रंदिवस घाम गाळणे -
वाक्य -परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस घाम गाळतात .

२ )धाबे दणाणणे -
वाक्य -पुलाचे चुकीचे बांधकाम समोर आल्याने कंत्राटदाराचे धाबे दणाणले .

३)पोटात घाबरा पडणे -
वाक्य - रस्त्यावर वाघ पाहिल्याने शाळेतून येताना मुलांच्या पोटात घाबरा पडला .

४)पायाखालची जमीन हादरणे -
वाक्य -गावात अचानक आलेला पूर पाहून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली .

प्रश्न ५ .पाठ्यपुस्तकपृष्ठ क्रमांक २८वरील उताऱ्यातील वाक्प्रचार व म्हणी शोधा व लिहा .
उत्तर -उताऱ्यातील वाक्प्रचार -
१ )चेहरा हिरमुसणे
२) बिनसणे 
३)चेहरा पडणे 
४)कानाडोळा करणे
५)उपदेशाचे डोस पाजणे
६)चार हात लांब राहणे
७)सावध करणे 
८)जिवश्च कंठश्च मैत्री असणे
९ )जीव तुटणे
१०)जिवाची घालमेल होणे .

उताऱ्यातील म्हणी -
१)अति झालं नि हसू आलं
२)अति तिथं माती
३)अति शहाणा त्याचा बैल रिकामा
४)नमनाला घडाभर तेल

प्रश्न ६ .तुमच्या निरीक्षणावरून पुढील गोष्टींचे वर्णन लिहा
१ )पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग -
उत्तर -काळ्या कापसाचा पुंजका आकाशात तरंगताना दिसतो त्याप्रमाणे आकाशात ढग जमलेले दिसतात .

२)पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी -
उत्तर -पाऊस उघडल्यानंतर तारेवर बसलेले पक्षी पाहून त्यांची शाळा भरली आहे असेच वाटते त्यांचाचिऊ ची वाट पाहून शाळेची आठवण येते .

३ )फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे -
उत्तर -आकाशातून कोणी रंगांची उधळण केली आहे असे शेतातील फुललेली फुलझाडे पाहून वाटते .

४)गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरांत लिहिलेल्या ओळी -
उत्तर -फळ्यावरील अक्षर पाहून एखाद्या चित्रकाराने आपली कलाकारी दाखवली आहे असे वाटते माझेही अक्षर असे असावे असे वाटते .

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post