प्रिय बाई

प्रश्न १ .एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)पत्र लिहिणार्‍या मुलीचे नाव काय आहे ?
उत्तर - पत्र लिहिणार्‍या मुलीचे नाव उर्मिला माने असे आहे .

२)पत्र लिहिणार्‍या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले ?
उत्तर - पत्र लिहिणार्‍या मुलीचे नाव पत्राच्या शेवटी उजव्या कोपर्‍यावर लिहिले आहे .

३)उर्मिला आनंदाने का उडाली ?
उत्तर - टीव्हीवरच्या बातमीत आदर्श शिक्षक पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्यामुळे ती आनंदाने उडाली .

४)उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे ?
उत्तर - उर्मिला सध्या पाचवीच्या वर्गात शिकत आहे .

५)उर्मिला ने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत ?
उत्तर - उर्मिलाने तिसरीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत .

६)उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे-जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते ?
उत्तर - ' तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय ? ' या पत्रातील वाक्यावरून उर्मिलाचे तिसरीच्या बाईंच्या घरी येणे-जाणे होते हे कळते .
प्रश्न २ .पुढील प्रश्नांची चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा .
१)उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला ? का दिला ?
उत्तर - बाईंना टिव्हीवर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या पाहून त्यांना उर्मिला अभिनंदन करण्यासाठी फोन  करत होती . पण फोन लागेना .तेव्हा आजोबांनी उर्मिलाला सांगितले की ,फोनचे काही खरे नाही त्यापेक्षा बाईंना पत्र लिही .हा आजोबांनी उर्मिलाला सल्ला दिला कारण पत्र बाईंना कायम आठवणीत राहील .

२)पाचवीत आल्यापासून उर्मिलाच्या कोण कोणत्या गोष्टीत बदल झाला ?
उत्तर - उर्मिलाला पाचवीत आल्यापासून आपण एकदम मोठे झालो आहोत असे वाटू लागले ती शाळेत एकटी जाऊ लागली .पाचवीत गेल्यापासून उर्मिला अभ्यास तर करते पण भरपूर खेळते ही ती दररोज संध्याकाळी जवळजवळ दोन तास मैदानात खेळते हा बदल पाचवीत आल्यापासून उर्मिला मध्ये झाला .

३)उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे ?
उत्तर - उर्मिलाने पत्रात बाईंनी सहलीला घेतलेल्या भन्नाट खेळांचा उल्लेख केला आहे . तसेच बाईंनी गाऊन शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बसवलेल्या नाटकाचा उल्लेख केला आहे .तसेच स्वाती जय व सलमा या मित्र-मैत्रिणींचा देखील उल्लेख केला आहे पाचवीत आपल्यात कोणता बदल झाला आहे याचा देखील उल्लेख केला आहे .

प्रश्न ३ .पुढील संवादवाचा सर्वनामांना अधोरेखित करा .
नीता : आज आपण झोका खेळूया
मंदार : दादा ,तू पण चल ना ?
दादा : मी नाही येणार , मुग्धाला ने .
मंदार :ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत 
दादा : त्या आल्या की तुम्ही खेळा .
नीता :आम्ही नाही खेळणार , तू आल्याशिवाय .

प्रश्न ४ .पुढील वाक्य वाचा त्या खालील वाक्यात पिशवीऐवजी योग्य सर्वनाम वापरून वाक्य लिहा .
पिशवी खूप सुंदर होती
१)पिशवीचा रंग गुलाबी होता .
उत्तर - तिचा रंग गुलाबी होता .

२)पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या .
उत्तर - तिच्यात खूप वस्तू ठेवता येत होत्या .

३)पिशवीला काचा , मणी लावलेले होते .
उत्तर -तिला काचा मणी लावलेले होते .

४)पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली .
उत्तर - ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली .

प्रश्न ५ .पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा . 
१)आपण बाजारातून भाजी आणू या .
(तुम्ही ,आपण ,आम्ही )

२)आईने जेवायला काय केले आहे ?
(कोणी , कोण ,काय )

३)कर्ण दानशूर होता . तो दररोज दान द्यायचा .
(तो ,ती , त्या )

४)ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयपांक केला .
(तिच्या , त्याच्या , त्यांच्या )

५ )आज आम्ही खूप मजा केली .
(आपण ,स्वतः ,आम्ही )

६)रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलवले . (त्याच्या , तिच्या ,त्यांच्या )


2 Comments

THANK YOU

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post