- प्रत्येक पुरावा तपासण्यासाठी शास्त्रीय पद्धत असते .
- इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे परंतू त्यातील पुरावा शोधण्यासाठी , तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करून इतर शास्त्रांची मदत घेतली जाते
- इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही . पुरावांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते . कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते
- माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते प्राचीन वस्तू , वास्तू , शिल्पे , भांडी , नाणी, कोरीव लेख , ताम्रपट , ग्रंथ , हस्तलिखिते इत्यादी ' इतिहासाची साधने ' आहेत या साधनांचे भौतिक , लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार पडतात .
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
१)भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात .
२)इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही .
३) इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो .
प्रश्न २ .प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)शास्त्रीय पद्धत कशी असते ?
उत्तर - ज्या पद्धतीमध्ये पुरावा विविध प्रकारे तपासाला जातो तो विश्वास ठेवण्या जोगा आहे की नाही हे पहिले जाते .
२) कृतीचा परिणाम सांगा :-स्वातंत्र्य प्राप्ती
उत्तर - स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्यलढा या कृतीचा परिणाम आहे .
३)इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते ?
उत्तर - इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाज प्रगत होण्यासाठी योग्य अयोग्य काय यांचा अभ्यास करणे शक्य होते .
४) इतिहासातील कोणत्या गोष्टींमुळे स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते ?
उत्तर - भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रांतून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते .
प्रश्न ३.पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा .
१)इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते ?
उत्तर - पुरावा हा प्रत्यक्ष प्रयोगा करून तपासता येतो हे शास्त्राचे वैशिष्ट्य असते . भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग शक्य नसते त्यातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते म्हणून इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते .
२) गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात ?
उत्तर - एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या साहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात .
प्रश्न ४ पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा .
उत्तर
भौतिक लिखित मौखिक
नाणी पत्रव्यवहार जात्यावरील
किल्ले ताम्रपट ओवी
भांडी शिलालेख लोकगीते
स्तंभ चरित्रग्रंथ लोककथा
लेणी
🙏👍👌
ReplyDeletePost a Comment
THANK YOU