पर्यावरणाचे संतुलन


प्रश्न १ .चूक की बरोबर ते सांगा .
१)पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश आहे .
उत्तर - बरोबर

२)जैवविविधता जपणे आवश्यक आहे .
उत्तर - बरोबर

३)नाकतोडा पक्ष्याला खातो .
उत्तर - चूक

प्रश्न २ .पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१)अन्नसाखळी म्हणजे काय उदाहरण लिहा .
उत्तर -एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो अन्नासाठी सजीव अशारीतीने परस्परांशी साखळी प्रमाणे जोडलेले असतात अशा साखळीला अन्नसाखळी म्हणतात .
उदाहरणार्थ -
सूर्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न बनवतात या वनस्पतीची पाने अळ्या खातात या अळ्यांना नाकतोडे खातात . नाकतोडा यांना चिमण्या खातात .
सूर्यप्रकाश - वनस्पती - अळ्या -नाकतोडे - चिमण्या

२)पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते ?
उत्तर - आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या आहे याद्वारे सजीव परस्परांवर अवलंबून असतात त्याच प्रमाणे निर्जीव घटक ही चक्राच्या प्रमाणे फिरत असतात जलचक्र कार मंडळ साईड ऑक्सीजन चक्र अशा चक्रात सजीव-निर्जीव यांच्यातहीपरस्पर देवाण-घेवाण होत असतेपर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते .

३)वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे ?
उत्तर -वनस्पतींच्या वाढीसाठी मातीतील पोषक घटकांची आवश्यकता आहे हे पोषक घटक खतं वाटे वनस्पतींना मिळतात प्राणी व मृत वनस्पतींचे अवशेष प्राण्यांचे मलमूत्र कशापासून सूक्ष्मजीव विघटन प्रक्रियेने पोषक घटक तयार करतातया पदार्थांपासून वनस्पतीची जोमाने वाढ होते .

प्रश्न ३ .काय करावे बरे ?
१)कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत .
उत्तर -धान्य उन्हात वाढायला घालावे त्यामुळे धान्यातील अळ्या कीटक जगू शकत नाही .
धान्य साठवणीची जागा कोरडी असावी तेथे हवा खेळती असावी
धान्य साठवताना कडुनिंबाचा पाला त्यामध्ये टाकावा .
प्रश्न ४ .सांगा पाहू .
१)हरणाचे अन्न कोणते ?
उत्तर -हरिन गवत खाते .कधी कधी छोटी झुडपे पाणी अशा वनस्पती देखील खाते .

२)वाघाचे अन्न कोणते ?
उत्तर -वाघ हा मांसाहारी प्राणी आहे तो शिकार करून भूक भागवतो .छोट्या मोठ्या प्राण्यांचे मांस हे अन्न आहे .

1 Comments

THANK YOU

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post