सायकल म्हणते , मी आहे ना !
प्रश्न १ . चार -पाच वाक्यांत उत्तरे लिहा .
१) मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात ?
उत्तर - मुले सायकलचा वापर कधी दूध आणण्यासाठी , कधी औषधाच्या गोळ्या आणणे , भाजीपाला आणणे , दुकानातून साबण आणणे यांसारखी इतर कामे करणे .
२) जो सायकल चालवतो त्याने वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही , असे का म्हटले आहे ?
उत्तर - सायकल घाम येईपर्यंत चालवल्यामुळे फुप्फुसे कार्यक्षम होतात व मांसपेशी तंदुरुस्त राहतात . अंगातून घाम निघाल्यामुळे जास्त चरबी जळून जाते व प्रतिकारशक्ती वाढते . पायांचे स्नायूही बळकट होतात म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही .
३) सायकलच्या रुपात कसा कसा बदल होत गेला ?
उत्तर - १६९० साली फ्रान्सच्या सिव्हर्क यांनी सायकल बनवली . तिला गती यावी म्हणून १८७६ साली डॉ. लॉसन यांनी पेडलला साखळीची दंततबकडी बसवली नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला आताच्या काळात टायरला गिअर जोडून वेग वाढवला . शर्यतीसाठी तिची वेगळी बांधणी असते अशा प्रकारे सायकलच्या रुपात बदला होत गेले .
प्रश्न २ . आकृतीमध्ये मुद्द्यांनुसार सायकल चालवण्याचे फायदे लिहा .
१) वैयक्तिक फायदे - व्यायाम , पैशांची बचत , पार्किंग सुलभ
२) समाजिक फायदे - वाहतूक कोंडी नाही , वायू प्रदूषण नाही , अपघातांचे प्रमाण कमी
३) राष्ट्रीय फायदे - इंधनाची बचत , इंधन परदेशातून विकत घ्यावे लागणार नाही , चलन वाचते .
प्रश्न ३ . पुढील शब्दांचे अर्थ समजून घ्या .
१) प्रचार व प्रसार -
एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ठामपणे सांगून पटवून देणे . प्रचार मुद्दामहून जाणीवपूर्वक करावा लागतो
प्रसार म्हणजे प्रचार केलेली गोष्ट फैलावणे
२)विश्वास व आत्मविश्वास -
विश्वास म्हणजे खात्री आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास आपल्यातील कार्यक्षमतेचे जाणीव स्वतःला होणे .
प्रश्न ४ .हलकीफुलकी म्हणजे खूप हलकी , तसे पुढील शब्दांचे अर्थ लिहा .
१)कधीमधी - म्हणजे अधून मधून
२)अवतीभवती - म्हणजे आजूबाजूला
३)धामधूम - म्हणजे जल्लोष
४)फेरफटका - म्हणजे फिरणे
५)साधेसुधे - म्हणजे खूप साधे
प्रश्न ५ . ' आडरस्ता 'यासारखे आणखी शब्द लिहा .
उत्तर - आडवाट ,आडगाव , आडमार्ग ,आड रस्ता
प्रश्न ६ .पुढील नामांचे दिलेल्या सारणी मध्ये योग्य वर्गीकरण करा
सतजल ,बाग , कविता , लाडू ,आंबेगाव ,शाळा , कीटक ,झेंडा ,लाकूड , प्राजक्ता ,मराठी ,आई ,कापड , बंडू , सह्याद्री .
सामान्यनाम - बाग ,लाडू , शाळा , कीटक ,झेंडा ,लाकूड ,आई ,कापड .
विशेषनाम - सतजल , कविता , आंबेगाव ,प्राजक्ता ,मराठी ,बंडू ,सह्याद्री
प्रश्न ७ .पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा .
१)रखडत चालणे -
वाक्य - परीक्षेची तारीख पुढे ढकलल्या वर शामू चा अभ्यास रखडत चालला होता .
२)धडा शिकणे -
वाक्य - अचानक मुलाच्या आजारपणामुळे सुधीरराव पैशा बचतीचा धडा शिकला .
३)हातभार लावणे -
वाक्य - पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शाळेतील मुलांनी हातभार लावला .
प्रश्न ८ .आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता ,सार्वजनिक वाहनाने प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले , तर कोणकोणते फायदे होतील ?
उत्तर - वायु प्रदूषण कमी होईल
जास्त लोक एकाच वाहनाने प्रवास केल्याने इंधनाची बचत होईल .
वाहतुकीची होणारी कोंडी कमी होईल
स्वतःचे श्रम वाचतील
प्रश्न ८ .तुमच्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्तीनी सायकलचा जास्त वापर केला पाहिजे , यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ?
उत्तर - i)पर्यावरण संरक्षणासाठी वायुप्रदूषण रोखण्यासाठी सायकलची कशी मदत होईल ते समजावून सांगू .
ii) सायकलमुळे वैयाक्तीक व्यायाम होतो
iii) इंधनाची बचत कशी होईल हे सांगेल
iv) पैशांची बचत होईल
v) सायकल वापराचे फायदे व महत्त्व पटवून देईन .
SANKET TANAJI KHADE
ReplyDeleteJfvvmfrthj
ReplyDeleteThis is very important for me tomorrow will be my marithia test
Deleteughhhh...i wanted more questions..and u ughhh mad
ReplyDeleteGood Thanks
ReplyDeleteThanks for your questions and answers
ReplyDeletePushpa
ReplyDeletePost a Comment
THANK YOU