डॉ .कलाम यांचे बालपण
 
प्रश्न १ .चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा .
१)लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत ?
उत्तर -लेखकाच्या लहानपणी काहीजणांना स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल समजण्यात महत्त्व वाटते .तर काही जणांना पेरियार रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता .जिज्ञासूंना हिटलर महात्मा गांधी बॅरिस्टर जीना यांच्या जीवना बद्दल माहिती हवी असायची . तर काही जणांना बाजारपेठेतली सोन्या-चांदीचे भाव समजण्यात उत्सुकता होती .

२)लेखकाला आयुष्यातील पहिली कमाई ची संधी कशी मिळाली ?
उत्तर -रामेश्वर मधला वृत्तपत्रांचा वितरक शमसुद्दीन पंबनवरून वृत्तपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम मध्ये आलेले गठ्ठे उतरून घेत नंतर युद्धामुळे  पंबनवून येणारी रेल्वे गाडी रामेश्वरला थांबत नसे तेव्हा चालत्या गाडीतून  वर्तमानपत्रांचे रामेश्वरम ते धनुष्यकोडी दरम्यान खाली फेकले जातात ते गोळा करण्यासाठी शमसुद्दीन ला मदतनीस हवा होता त्याने लेखकाला मदतनीस च्या कामाला घेतले अशाप्रकारे लेखकाला कमाईची संधी मिळाली .

३ )डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले ?
उत्तर -डॉक्टर कलाम यांनी वडिलांकडे बाहेरगावी शिक्षणाची परवानगी विचारली तेव्हा वडील त्यांना म्हणाली की ,तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे .सीगल पक्षी घरटे सोडून एक ते दूरवर उडत जातात व नवे प्रदेश शोधतात तसे या मातीचा व इथल्या आठवणींचा मोह तुला सोडावा लागेल . तुझ्या इच्छा तेथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे . आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही .आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत .

४)रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता ?
उत्तर -रामनाथपुरला नेहमी गजब असायची .रामेश्वरमला जसा एकजिनसीपणा होता तसा तिथे नव्हता .लेखकाला घराची ओढ अस्वस्थ करायची शिक्षणाच्या खूप संधी पेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओळख लेखकाला मोलाची वाटत असे .त्यामुळे लेखकाचा जीव रामनाथपुरमला नव्हता .

प्रश्न २ .पुढील शब्दांत लपलेले शब्द शोधा.
१)परवानगी - रवा , वार, वानगी , नवा , परवानगी ,नर , पर .

२)हजारभर -हजार , रजा , भजा , भर , हर

३)एकजिनसी - एक ,जिनसी ,जिन .

४)जडणघडण - जड , जडण , जण , घडण , घड , घण .

प्रश्न ३ .पुढील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्ये तयार करा .
१)वितरक -
वाक्य -पुस्तकांचे वितरक वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचवतात .

२)गिऱ्हाईक -
वाक्य -स्वस्त भाजीवाल्याकडे गिऱ्हाईकांची झुंबड उडाली .

३)वर्तमानपत्र -
वाक्य -वर्तमानपत्र वाचून जगभरातील माहिती मिळते .

४)एकखांबीतंबू -
वाक्य - रखमाची कुटुंब म्हणजे एक खांबी तंबू होय .

प्रश्न ४ . ' एक खांबी तंबू ' म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे तसे पुढील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तींकडून माहिती करून घ्या त्यांचा वाक्यात उपयोग करा .
१)कर्ताधर्ता -म्हणजे घरातील कमवता एकमेव माणूस
वाक्य -राधाबाई च्या घरात कोणी कर्ताधर्ता पुरुष नाही .

२)खुशाल चेंडू -चैनी माणूस
वाक्य -सहा माणसाच्या कुटुंबात सुहास अगदी खुशाल चेंडू होता .

३)लिंबूटिंबू -अगदी किरकोळ
वाक्य -मोठ्या मुलांच्या खेळात छोट्या चिंटूला लिंबुटिंबु म्हणून घेतात .

४)व्यवस्थापक -नियोजन करणारा
वाक्य -मोठ्या लग्नसमारंभात आदर्श ने एक व्यवस्थापकाचे काम केले .

प्रश्न ५ .पुढे काही सामान्य नाम विशेष नाम ए व भाववाचक नामे दिली आहे पुढील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा .
नामे - देशमुख , चांगुलपणा , कडधान्य ,कळसुबाई ,पर्वत ,वासल्य , शिखर , फुल , नवलाई ,आडनाव ,माणुसकी , हिमालय ,मुलगी , नम्रता, जास्वंद ,मटकी ,कविता .
उत्तर -
सामान्यनामे -मुलगी , कडधान्य , पर्वत , शिखर ,फूल ,आडनाव .
विशेष नामे -सविता , देशमुख ,कळसुबाई, हिमालय ,जास्वंद ,मटकी .
भाववाचक नामे -माणुसकी , चांगुलपणा ,वात्सल्य ,नवलाई , नम्रता .

प्रश्न ७ .पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा .
१)मनाली मुंबईहून तिच्या गावी गेली .
उत्तर -मनाली -विशेष नाम ,मुंबई -विशेष नाम ,गावी -सामान्य नाम

२)मुलांच्या हलगर्जीपणामुळे इस्त्रीचे वायर जळाली उत्तर - मुलांच्या - सामान्य नाम ,हलगर्जीपणामुळे -भाववाचक नाम ,इस्त्री -सामान्य नाम ,वायर -सामान्य नाम

३)सुधीरला पुरणपोळी आवडते .
उत्तर - सुधीरला -विशेष नाम ,पुरणपोळी -विशेष नाम

४)ताजमहालाचे सौंदर्य काही निराळेच आहे .
उत्तर -ताजमहल -विशेष नाम ,सौंदर्य -भाववाचक नाम

प्रश्न ८ .पुढील चित्रांच्या समोर सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम लिहा .3 Comments

THANK YOU

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post