अरण्यलिपी

प्रश्न १ .एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)अरण्य लिपी म्हणजे काय ?
उत्तर - जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खाणाखुणांना अरण्यलिपी म्हणतात .

२)वाघांची गणती कशावरून केली जाते ?
उत्तर - वाघांच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते .

३)जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात ?
उत्तर - जंगलात हरिण ,सांबर , काळविट हे प्राणी धोक्याची सूचना देतात .

प्रश्न २ .पुढील प्रश्नांचे तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा .
१) 'वाघाचे क्षेत्र 'कशावरून ओळखता येते ?
उत्तर - आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पालापाचोळ्यात तून चालत नाही पाऊलवाटेवरून किंवा नदी-नाल्यांच्या पात्रातून वाळूवरून चालतो नदी-नाले यातली ओली वाळू तपासावी आढळतात त्यावरून वाघांची क्षेत्र ओळखता येते .

२)वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो ?
उत्तर - वाघिणीचे पुढचे पाय चौकोणी असतात पण त्यांच्या मागच्या पंजांत फरक असतो वाघाचे पंजे चौकोनी असतात तर वाघिनीचे मागचे पंजे आयताकृती असतात .

३)शिकार झालेल्या प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते ?
उत्तर - काही प्राण्यांच्या विष्टेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस , नखे व हाडे आढळतात या न पचलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेल्या प्राणी कोणता होता हे ओळखता येते .

प्रश्न ३ .या पाठात पालापाचोळा झाडेझुडपे, नदीनाले हे जोडशब्द आले आहेत यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा .
उत्तर १)केरकचरा २)साफसफाई ३)कामधंदा
     ४)झाडलोट ५ )मौजमजा

प्रश्न ४ . 'मजा 'या शब्दाला ' शीर ' हा शब्द लावून ' मजेशीर 'हा शब्द तयार झाला आहे यासारखे आणखी शब्द शोधून लिहा .
उत्तर - १) गमतीशीर     २)आटोपशीर
           ३) हवेशीर

प्रश्न ५)पुढील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा .
१) ते बाजारात गेले . -
ते बाजारात गेले .

२)तुला त्यांनी हाका मारल्या-
तुला त्यांनी हाका मारल्या

३) आम्ही जेवत होतो - आम्ही जेवत होतो

४)त्याचा आवाज गोड आहे - त्याचा आवाज गोड आहे

५)मी स्वतः झाडून घेतले- मी स्वतः झाडून घेतले .

६)आपण प्रकल्प पूर्ण करूया .-
आपण प्रकल्प पूर्ण करूया .

प्रश्न ६ .पुढे काही वाक्य दिली आहेत त्यातील नामे ओळखून त्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा .
१)हसीना खूप हुशार आहे
   ती रोज शाळेत जाते

२)पक्षी उडत उडत लांब गेले
        ते दिसेनासे झाले .

३)बाई मुलांना खाऊ वाटत होत्या .
    त्या मुलांशी गप्पा मारत होत्या .

४)भाऊ घरात गेला .
 त्याला काही सुचेना .

प्रश्न ७ .या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा .
उत्तर -  आपण ,आपल्याला , त्यांच्या , त्या , त्यात ,तुम्हास ,आपला ,तो ,ते ,हे , त्याचा , त्याचे ,यांच्या , ती ,ही , अशी सर्वनामे पाठात आली आहेत .

6 Comments

THANK YOU

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post