पृथ्वी आणि जीवसृष्टी

प्रश्न १ .  पुढील वाक्यातील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा .
१) अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे .
उत्तर - अमीन चे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे .

२)रिया पठारी भागात राहते .
उत्तर - रिया पठारी भागात राहते .

प्रश्न २ . पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१)ढग कशाचे बनलेले असतात ?
उत्तर -पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून ढग बनलेले असतात . सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याचे बाष्प होते हे बाष्प हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते येथे भाजपाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात .

२)जीवावरण कशाला म्हणतात ?
उत्तर - पृथ्वीच्या शिलावरण,वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव हे एकत्रितपणे जिवावरण बनवतात जलावरण आणि वातावरण या तीन भागांत राहणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात .

प्रश्न ३ .जरा डोके चालवा
१)सूक्ष्मजीव महत्वाचे का असतात ?
उत्तर -पृथ्वीवर सगळीकडे सूक्ष्मजीव आहे हे सूक्ष्मजीव खूप कार्य करतात .अन्नसाखळी त्यांची महत्त्वाची जागा आहे वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात .सूक्ष्मजीव नसते तर सर्व पृथ्वीवर कचरा साचून राहिला असता .

२)समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा .
उत्तर -समुद्रापासून आपल्याला खूप आवश्यक गोष्टी मिळतात .समुद्रात अनेक सागरी सजीव राहत असतात त्यापैकी काही माणसाचे अन्न आहेत .भाषांतील उत्कृष्ट प्रथिने व मेदाम्ले यामुळे आता चांगले पोषण होते .शिंपले माखले अशा मृदुकाय प्राण्यांना पण म्हणून मागणी आहे समुद्री शेवाळापासून अगार हा पदार्थ तयार करतात याचा वापर जेली व पुडिंग घट्ट करण्यासाठी वापरतात .समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करतात काही देशांमध्ये समुद्राचे पाणी पिण्याजोगे पाणी म्हणून बनवले जाते .

प्रश्न ४ .टिपा लिहा
१)बाष्पीभवन - 
                उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपांतर होते या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात .जमिनीत जिरवलेल्या पाण्याचेही बाष्प बनत असते .बाष्पीभवनाचा या क्रियेने बनलेले बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते तेथे त्याचे संघनन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते .

२)संघनन - 
            संघनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया होय .निसर्गात संघननाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो .उंचावर पोहोचलेल्या भाजपाचे संघटन होऊन त्यापासून बाष्पाचे सूक्ष्म कण तयार होतात याच पासून पाऊस पडतो .

३)जलचक्र -
             पाण्याचा प्रवास एखाद्या चक्राप्रमाणे चालू असतोसूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते हे बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या उंच थरात जाते उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संघनन होते या बाष्पापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे लहानपण ढगांच्या रूपात आकाशात तरंगते व सूक्ष्म कणांचे मोठे व जड थेंब म्हणून पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतात या क्रियेला जलचक्र असे म्हणतात .

प्रश्न ५ .काय करावे बरे ?
१)उन्हात फिरले कि त्वचेवर चट्टे पडतात .
उत्तर -उन्हातल्या किरणांची दाहकता जास्त असते त्यामुळे आपली त्वचा भाजल्यास सारखी होते .म्हणून कडक उन्हात फिरू नये .हात पाय झाकले जातील असे सुती कपडे वापरावे चेहऱ्याला रुमाल बांधावा घरी आल्यावर थंड पाण्याने हात पाय स्वच्छ धुवावे .

२)जगातील सर्व भागांतून हिमनद्या वितळत आहेत .
उत्तर -जगभरात कार्बन डाय ऑक्साइड वायूचे प्रमाण वाढत असल्यामुळे तापमानात वाढ होत आहे .वाढलेल्या तापमानामुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत .वितळलेल्या नद्यांमुळे समुद्रजलाची पातळी वाढत आहे .त्यामुळे मुद्रकिनार्‍यावरील प्रदेशाला धोका निर्माण झाला आहे म्हणून जागतिक तापमान वाढ रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे यासाठी झाडे लावायला हवी .

३)तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी तयार करा त्यातील कोणत्याही दोन रूपांचे वर्णन करा .
उत्तर -आमच्या परिसरात छोटी टेकडी पठार दूरवर पर्वतांच्या रांगा दिसतात .
मैदान -
       मैदान हा जमिनीचा सपाट भाग आहे
टेकडी -
       टेकडी म्हणजे छोट्या उंचीचा डोंगर टेकडी वरील जमीन उतरती असते टेकडी आपण सहज चढून जाऊ शकतो .

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post