Download PDF with Timer

Download PDF

एका वाक्यात उत्तरे लिहा pdf प्रश्नपत्रिकेसाठी क्लिक करा .

इयत्ता सहावी भूगोल - एका वाक्यात उत्तरे

इयत्ता सहावी भूगोल - एका वाक्यात उत्तरे

1) पर्जन्याचे उगमस्थान कोणते?

महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे.

2) समुद्रात ज्वालामुखी होत असतील काय?

समुद्रात ज्वालामुखी होत असतील.

3) पॅसिफिक महासागराचा किनारा कोण कोणत्या खंडालगत आहे?

पॅसिफिक महासागराचा किनारा उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या खंडालगत आहे.

4) पृथ्वीवरील कोणता समुद्र हा सर्वात क्षारयुक्त समुद्र म्हणून ओळखला जातो?

पृथ्वीवरील मृत समुद्र हा सर्वात क्षारयुक्त समुद्र म्हणून ओळखला जातो.

5) समुद्रजीवांचा कोणत्या कारणांसाठी वापर होतो?

समुद्राजीवांचा आहार, औषधनिर्मिती, खतनिर्मिती आणि संशोधन या कारणांसाठी वापर होतो.

6) ग्रहीय वारे म्हणजे काय?

वायुदाब पट्ट्यांमुळे निर्माण होणारी वारे म्हणजे ग्रहीय वारे होत.

7) ध्रुवीय प्रदेशांकडून विषुववृत्ताकडे कोणते सागरी प्रवाह वाहतात?

ध्रुवीय प्रदेशांकडून विषुवृत्तांकडे शीत सागरी प्रवाह वाहतात.

8) एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे किती टक्के जल महासागरात असते?

एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे 97.7 टक्के जल महासागरात असते.

9) नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी कुठे मिळते?

नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी समुद्राला मिळते.

10) विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशांकडे कोणते सागरी प्रवाह वाहतात?

विषुववृत्तांकडून ध्रुवीय प्रदेशांकडे उष्ण सागरी प्रवाह वाहतात.

११) पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग जलमय आहे ?
उत्तर - पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग जलमय आहे .
१२) शिलावरण कशाचे बनलेले आहे ?
उत्तर - शिलावरण खडक व माती यांचे बनलेले आहे .
१३) खडक म्हणजे काय ?
उत्तर - पृथ्वीच्या शिलावरणामध्ये तयार झालेली खनिजांचे मिश्रण म्हणजे 'खडक ' होय .
१४) कोणत्या प्रकारच्या खडकांच्या रूपांतरणातून रूपांतरित खडक तयार होतात ?
उत्तर - अग्निजन्य खडक व स्तरित खडक या प्रकारच्या खडकांच्या रूपांतरणातून रूपांतरित खडक तयार होतात .
१५) शिलारस व लाव्हारस थंड होत जाऊन कोणत्या प्रकारचे खडक तयार होतात ?
उत्तर - शिलारस व लाव्हारस थंड होत जाऊन अग्नीजन्य खडक तयार होतात .
१६) खडकांचे गुणधर्म कोणत्या बाबींवर अवलंबून असतात ?
उत्तर - खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ , खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याची प्रक्रिया या बाबींवर अवलंबून असतात .
१७) महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी कोणत्या प्रकारचा खडक वापरला असावा ?
उत्तर - महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक वापरला असावा .
१८) जीवाश्म म्हणजे काय ?
उत्तर - मृत प्राण्यांच्या वनस्पतींच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे गाळात उमटणारे व कालांतराने घट्ट होत जाणारे त्यांचे ठसे म्हणजे जीवाश्म होय .
१९) महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक का वापरला असावा ?
उत्तर - बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक कठीण जड व एक जिनसी स्वरूपाचा असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी तो वापरला असावा .
२०) खनिजे म्हणजे काय ?
उत्तर - रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेली अजैविक संयुगे म्हणजे खनिजे होत .
२१) खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात ?
खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात.
२२) शेती व्यवसायातील महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन कोणते ?
मृदा हे शेती व्यवसायातील महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन होय.
२३) पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे ?
पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण 29.8% आहे.
२४) 'नैसर्गिक संसाधने 'म्हणजे काय ?
मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाकडून वापरण्यात येणारे निसर्गातून उपलब्ध असणारे घटक, म्हणजे 'नैसर्गिक संसाधने' होत.
२५) खनिज तेल कोठे सापडते ?
खनिज तेल भूपृष्ठाखाली किंवा सागर तळाखाली जमिनीत सापडते.
२६) दगडी कोळसा प्रामुख्याने कोठे वापरला जातो ?
दगडी कोळसा प्रामुख्याने उद्योगधंद्यांमध्ये वापरला जातो.
२७) खनिज तेलास काळे सोने असे का म्हणतात ?
खनिज तेलाच्या काळसर रंगामुळे व त्याच्या जास्त किमतीमुळे खनिज तेलास 'काळे सोने' असे म्हणतात.
२८) पृथ्वीच्या केंद्रापाशी तापमान किती असते ?
पृथ्वीच्या केंद्रापाशी तापमान सुमारे 4000 सेल्सिअस असते.
२९) पृथ्वीच्या अंतर भागातील तापमान प्रत्येक 32 मीटरला कितीने वाढते ?
पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक 32 मीटरला एक अंश सेल्सिअसने वाढते.
३०) 'जैविक ऊर्जा साधने 'म्हणजे काय ?
वनस्पती व प्राणी यांच्या मृतावशेषाचा समावेश होऊन निर्माण झालेली ऊर्जा साधने, म्हणजे जैविक ऊर्जा साधने होत.
३१) भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचे अंतर किती किमी आहे ?
भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंत ६३७३ किमी आहे.
३२) कोणत्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात ?
निसर्गावर आधारित असणारे व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात.
३३) कोणत्या व्यवसायांना तृतीय व्यवसाय म्हणतात ?
प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायांना आणि द्वितीय व्यवसायांना पूरक स्वरूपाच्या सेवा देणारे व्यवसायांना तृतीय व्यवसाय म्हणतात.
३४) कोणत्या व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात ?
विशेष प्राविण्य असणाऱ्या व्यक्तींकडून दिल्या जाणाऱ्या विशेष सेवा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात.
३५) कोणत्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात ?
प्राथमिक व्यवसायातून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात.
३६) विकसनशील देशांत कोणत्या व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण सर्वाधिक कार्यरत असते ?
विकसनशील देशांत प्राथमिक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण सर्वाधिक कार्यरत असते.
३७) विकसित देशांत कोणत्या व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण सर्वाधिक कार्यरत असते ?
विकसित देशांत तृतीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण सर्वाधिक कार्यरत असते.

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post