कुटुंबातील मूल्ये

प्र 1.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
१)प्रामाणिकपणा ही आपली ...ताकद...असते .

२)सामाजिक जीवनात सर्वांना     सहकार्याची गरज असते .

३)आपल्या देशात    सहिष्णू     वृत्तीला विशेष महत्त्व आहे .

४)समतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना           प्रगती        करता येते .

५)प्रामाणिकपणा आपल्याला     निर्भय
बनवतो .

प्रश्न २ .एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात ?
उत्तर - परिसरातील बदलाविषयीचे निर्णय परिसरातील सर्वांनी मिळून घ्यायचे असतात .

२) ' सहिष्णुता 'म्हणजे काय ?
उत्तर - आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय .

३) ' स्त्री -पुरुष समानता ' म्हणजे काय ?
उत्तर मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानने म्हणजे स्त्री - पुरुष समानता होय .

४)स्त्री-पुरुषांच्या समान गरजा कोणत्या ?
उत्तर -अन्न ,वस्त्र ,निवारा आरोग्य व शिक्षण या स्त्री-पुरुषांच्या समान करता आहेत .

५)आपले सामाजिक जीवन कशामुळे समृद्ध बनते ?
उत्तर आपले सामाजिक जीवन विविधतेमुळे समृद्ध बनते .

प्रश्न ३ .दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
१)कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो ?
उत्तर -कुटुंबात एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो . घरातील कोणत्याही गोष्ट करताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो .प्रत्येकाची आवडनिवड विचार भिन्न असू शकतात तरीही अनेक बाबतीत आपले विचार येऊ शकतात .

२)निर्णय घेण्यात सहभागी झाल्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात ?
उत्तर -आपले मत मांडण्याची सर्वांना संधी मिळते .कुटुंबात आपल्या म्हणण्याचा आदर केला जात आहे हे पाहून कुटुंबाबद्दल आपुलकी वाटते .व्हिडिओ एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने विषयाच्या सर्व बाजू समजतात .

३)सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते ?
उत्तर -आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करून दुसऱ्याचे ही एकले पाहिजे .एकमेकांच्या विचारांत मतभिन्नता असली तरी दुसऱ्याचे ही म्हणणे समजून घेतले पाहिजे . मित्र-मैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील उणिवा दूर करता येतात .

४)सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणाचे महत्व सांगा .
उत्तर -प्रामाणिकपणे वाढल्यास घरात व बाहेरही सर्वांना आपल्याविषयी आदर वाटतो .प्रत्येक काम सचोटीने करून नातेवाईकांचा विश्वास संपादन करता येतो .प्रामाणिकपणे वागल्यास आपल्याला खरे बोलण्याची सवय लागते

प्रश्न ४ .तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा .
१)समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना का वाढीस लागली पाहिजे ?
उत्तर - स्त्री-पुरुष समानते मुळे दोघांनाही शिकण्याची संधी मिळते .अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण अशा सुविधांवर दोघांचाही समान अधिकार असतो ही समज येते .स्त्री पुरुष समानता सर्वांना प्रगती साधता येते .

4 Comments

THANK YOU

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post