रंग जादुचे पेटीमधले

प्रश्न १ .एका वाक्यात उत्तरे लिहा .
१)हिरवे राघू कुठे उडत आहेत ? 
उत्तर -हिरवे राघू निळ्या आकाशात उडत आहेत .

२)निर्झर कोठून व कसे वाहतात ?
उत्तर -निर्झर डोंगरातून खळखळ आवाज करीत निर्मळ पणे वाहतात .

३)चित्रातील भिंती कशा तयार होतात ?
उत्तर - नेमक्या चार रेषांमधून चित्रातील भिंती तयार होतात .

४)पाऊलवाटेवरून कोण येते ?
उत्तर -पाऊलवाटेवरून सखेसोबती येतात .

५)वाऱ्यावर काय डुलते ?
उत्तर - वाऱ्यावर जांभळ्या फुलांची गारवेल डुलते .

प्रश्न २ .पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१)इंद्रधनुष्यातील रंगांना ' जादूच्या पेटीतील रंग ' असे का म्हटले आहे ?
उत्तर - इंद्रधनुष्यात सात रंग असतात पावसाच्या थेंबा मधून प्रकाश किरण जातो तेव्हा त्या पांढऱ्या रंगातून अनुक्रमे तांबडा , नारंगी , पिवळा , हिरवा , निळा ,पारवा व जांभळा असे सात रंग उमटतात पांढऱ्या रंगात लपलेले हे सात रंग असतात ही जादू आहे . म्हणून इंद्रधनुष्यातील रंग 'जादूचे पेटीमधले रंग ' असे म्हटले आहे .

प्रश्न ३ .कवितेत दिलेल्या प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच पाच गोष्टींची नावे लिहा .
पांढरा - पांढरे मीठ , पांढरा कागद , पांढरे  दूध , पांढरी भिंत , पांढरा ससा .

२)निळा -  निळे आकाश , निळे शाही , निळा पेन ,निळा शर्ट , निळी चॉकलेट .

३)हिरवा -हिरवी पाने , हिरवी मिरची , हिरवा कागद , हिरवे गवत ,हिरवे झाड .

४)लाल - लाल साडी , लाल बॉल , लाल चप्पल ,लाल टोपी , लाल टोमॅटो .

५)काळा -काळे केस ,काळे पॅन्ट , काळीशाही , काळा कागद , काळी साडी

६)जांभळा - जांभळी वेल , जांभळी टोपी , जांभळी वांगी , जांभळे जांभूळ ,जांभळा कपडा .

७)रुपेरी - रुपेरी मुकुट ,रुपेरी साडी , रुपेरी चांदणी ,रुपेरी चंद्र ,रुपेरी वाळू .

८)तांबडा - तांबडा कुत्रा  , तांबडे गाढव  , तांबडा ग्लास  ,तांबडी पेन ,तांबडा रस्सा

प्रश्न ३ .समानार्थी शब्द लिहा
१)आभाळ - आकाश

२)राघू - पोपट

३)वेल - लता

४)निर्झर - झरा

प्रश्न ४ .कवितेत खिडक्यादारे हा शब्द आला आहे याचा अर्थ खिडक्या व दारे असा होतो यां सारखे आणखी शब्द शोधा व लिहा .
उत्तर - घरदार ,पाटी दप्तर ,भाजीभाकरी ,ताट वाटी ,भाऊ-बहीण ,आईवडील .

प्रश्न ५ . कवितेचा सखेसोबती हा जोडशब्द आला आहे दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे यासारखे शब्द माहीत करुन घ्या .
उत्तर -पाऊसपाणी , पालापाचोळा ,केरकचरा मुलेबाळे , कामधंदा ,भाजीपाला .

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post