मुंग्याच्या जगात
प्रश्न १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१)कीटकांमध्ये मुंगी चे नाव सर्वप्रथम का घेतले जाते?
उत्तर- मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय आणि हुशार असते म्हणून कीटकांमध्ये मुंगीच्या नाव सर्वप्रथम केली जाते.
२)मुंग्या गंधकण केव्हा सोडतात?
उत्तर- अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकण सोडतात .
३)मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात?
उत्तर- वसाहतीचे संरक्षण व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.
४) मुंग्या स्वतःचे व वसाहतीची संरक्षण कसे करतात? उत्तर-विषारी दंश करून, शत्रूवर विशिष्ट आम्लाचा फवारा करून आणि कडकडून चावा घेऊन त्या स्वतःचे व सध्याचे संरक्षण करतात.
५) मुंगी चिरडल्यावर काय होते?
उत्तर- मुंगी चिरडल्यावर ती अधिक प्रमाणात गंधकण सोडते .
प्रश्न२ ). पाठात आलेले मुंगीचे कोणते गुण किंवा विशिष्ट तुम्हाला आवडले ते सांगा.
उत्तर-मुंगी कष्टाळू, उद्योगी व हुशार .
मुंगीच्या अंगात रासायनिक गंधकण असतात.वसाहतीचे संरक्षण व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.विषारी दंश करून, शत्रूवर विशिष्ट आम्लाचा फवारा करून आणि कडकडून चावा घेऊन त्या स्वतःचे व सध्याचे संरक्षण करतात.
प्रश्न३) मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेले आहेत शोधा व लिहा याप्रमाणे एखाद्या शब्दाची नामाची वेगवेगळी रूपे लिहा.
उत्तर- मुंगी- मुंगीला, मुंग्यांच्या, मुंगीला, मुंगीच्या, मुंगीला, मुंग्यांना, मुंग्यांचा.
आंबा- आंब्याच्या, आंब्याची, आंब्याला, आंब्याचा, आंब्याचे .
प्रश्न ४) वाक्यात उपयोग करा
१)माग काढणे
वाक्य - कुत्र्याने चोरांचा माग काढून पोलिसांना मदत केली.
२)सावध करणे
वाक्य- पावलांच्या आवाजाने झोपलेली आजी सावध झाली.
३) फवारा सोडणे
वाक्य- शेतकरी पंपाच्या साह्याने तणनाशकाचा तणावर फवारा सोडतो.
४) तत्पर असणे
वाक्य- आमच्या शाळेतील हे राजू नेहमी खेळण्यासाठी तत्पर असतो.
५)पळ काढणे
वाक्य- बागेचा मालक येताच मित्रांनी पळ काढला.
६) दाह होणे
वाक्य- योग्य वेळी डोळ्यात औषध न घातल्याने डोळ्यांचा दाह सुरू झाला.
प्रश्न ५) पुढील वाक्यातील नाम ओळखा व सांगा.
१)बंडूची इजार चार बोटे लांब झाली.
उत्तर- बंडू, इजार, बोटे
२)आईने इजार एका कोनाड्यात फेकली .
उत्तर- आई, इजार, कोनाडा
३) माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत.
उत्तर- माणूस , मुंग्या,
४) आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे.
उतर- कविता , भारत, धावपटू.
प्रश्न ६ ) पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे घाला.
१)आई माधवला म्हणाली.
२)आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या.
३)घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो.
४)मराठी विषय मला खूप आवडतो.
५) राष्ट्रपतींचे भाषण एकूण समीर मंत्रमुग्ध झाला.
६)महागाई वाढल्याने वस्तू महागल्या.
9175
ReplyDeletePost a Comment
THANK YOU