इयत्ता सहावी मराठी - एका वाक्यात उत्तरे

इयत्ता सहावी - एका वाक्यात प्रश्नोत्तरे

विषय - मराठी

१) किरणांची कलाबूत कशी मोहरेल असे कवीला वाटते?

उदासवाणा गडद अंधार ओसरून उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल असे कवीला वाटते.

२) आनंदाने मृदू गळ्यात कोण जाणार आहे?

आनंदाने मृदू गळ्यात पक्षी जाणार आहेत.

३) पानांवर दहिवर केव्हा हसेल?

गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहिवर हसेल.

४) उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे?

उजाडल्यामुळे अंधाराचे भय संपणार आहे.

५) प्रकाशाचे महादान कोणते?

दाही दिशा उजळून प्रकाशाने आकाश भरून जाणे हे प्रकाशाचे महादान होय.

६) गारवा कशामुळे थरारेल?

उजाडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करून सुगंधामुळे गारवा थरारेल.

७) बाल सभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते?

महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले होते.

८) बाल सभेचे सूत्रसंचालन कोणी केले?

बाल सभेचे सूत्रसंचालन तन्वीने केले.

९) बाल सभेचा अध्यक्ष कोण होता?

बाल सभेचा अध्यक्ष कुणाल होता.

१०) मेट्रो ट्रेनमध्ये कॅमेरा कुठे लावलेले असतात?

मेट्रो ट्रेनमध्ये मेट्रोच्या डब्यात व स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात.

११) टोकन कशाला म्हणतात?

मेट्रोच्या तिकिटाला टोकन म्हणतात.

१२) लेखिकेच्या बोटाला दुखापत कशाने झाली?

लेखिकेच्या बोटाला दुखापत बत्त्याने झाली.

२७) प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे ऐवजी कशाचा वापर करावा?

कापडी पिशव्या वापरण्याचा सल्ला दिला आहे.

२८) खासबा जाधव यांच्या आई-वडिलांचे नाव काय होते?

खाशाबा जाधव यांच्या आईचे नाव पुतळाबाई व वडिलांचे नाव दादासाहेब होते.

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post