Download PDF with Timer

Download PDF

खालील प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात हवी असल्यास पुढे क्लिक करा.

भूगोल विषयातील महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे

भूगोल विषयातील महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे

1) तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे?

उत्तर:

तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे 55 ते 65 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे.

2) शीत पट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश कोणते?

उत्तर:

टुंड्रा प्रदेश व तैगा प्रदेश हे शीत पट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश होत.

3) गवताळ प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक राहतात?

उत्तर:

गवताळ प्रदेशात प्रामुख्याने झुलु, हौसा, मसाई इत्यादी जमातीतील लोक राहतात.

4) उष्ण वाळवंटी प्रदेशात कोणत्या ठिकाणी शेती केली जाते?

उत्तर:

उष्ण वाळवंटी प्रदेशात मरुद्याने व नद्यांची खोरी या ठिकाणी शेती केली जाते.

5) भूमध्य सागरी प्रदेशात कोणत्या संस्कृतीचा विकास झाला?

उत्तर:

भूमध्य सागरी प्रदेशात ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास झाला.

6) त्से-त्से माश्या प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात?

उत्तर:

त्से-त्से माश्या प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशात आढळतात.

7) ह्युमस म्हणजे काय?

उत्तर:

मृदेतील विघटित झालेल्या जैविक पदार्थ म्हणजे 'ह्युमस' होय.

8) महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर:

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हापूस आंबा या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

9) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्र्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर:

महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा संत्र्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

10) दक्षिण भारतातील तांबडी मृदा कोणत्या मूळ खडकांपासून तयार झालेली आहे?

उत्तर:

दक्षिण भारतातील तांबडी मृदा ग्रॅनाईट व नीस या मूळ खडकांपासून तयार झालेली आहे.

11) महाराष्ट्रात बेसॉल्ट खडकांच्या अपक्षालनातून कोणती मृदा तयार झालेली आहे?

उत्तर:

महाराष्ट्रात बेसॉल्ट खडकांच्या अपक्षालनातून जांभी मृदा तयार झालेली आहे.

12) महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर:

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हापूस आंबा या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

13) दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता?

उत्तर:

22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय.

14) पृथ्वीच्या कललेल्या अक्षांमुळे पृथ्वीवर कोणत्या बाबी घडतात?

उत्तर:

पृथ्वीच्या कललेल्या अक्षांमुळे पृथ्वीवर ऋतू विविधता व ऋतू बदल या बाबी घडतात.

15) उत्तरायणाचा कालावधी कोणता?

उत्तर:

22 डिसेंबर ते 21 जून हा उत्तरायणाचा कालावधी होय.

16) दक्षिणायनाचा कालावधी कोणता?

उत्तर:

21 जून ते 22 डिसेंबर हा दक्षिणायनाचा कालावधी होय.

17) दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता?

उत्तर:

22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय.

18) संपात दिनाच्या दिवशी दोन्ही ध्रुवांवर सूर्योदय व सूर्यास्त होत असतो. 21 मार्च रोजी सूर्योदय कोणत्या ध्रुवावर होईल?

उत्तर:

संपात दिनाच्या दिवशी दोन्ही ध्रुवांवर सूर्योदय व सूर्यास्त होत असतो. 21 मार्च रोजी सूर्योदय उत्तर ध्रुवावर होईल.

19) सूर्योदयाची व सूर्यास्ताचे स्थान 22 डिसेंबर नंतर कोणत्या दिशेला सरकल्यासारखे वाटेल?

उत्तर:

सूर्योदयाची व सूर्यास्ताचे स्थान 22 डिसेंबर नंतर उत्तर दिशेला सरकल्यासारखे वाटेल.

20) पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल?

उत्तर:

प्राचीन काळापासूनचे पेंग्विन या प्रजातीचे केवळ दक्षिण ध्रुवावर वास्तव्य असणे हे पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण असावे.

21) मळ्याच्या शेतीत प्रामुख्याने कोणत्या पिकांचे उत्पादन घेतले जाते?

उत्तर:

मळ्याच्या शेतीत प्रामुख्याने चहा, कॉफी, रबर, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ, विविध फळे आणि फुले इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते.

22) मत्स्यशेती म्हणजे काय?

उत्तर:

मत्स्यबीजाद्वारे माशांची कृत्रीमरीत्या पैदास करणे म्हणजे मत्स्यशेती होय.

23) पशुपालन व्यवसायातून कोणती उत्पादने मिळतात?

उत्तर:

पशुपालन व्यवसायातून दूध, अंडी, मांस, कातडी, लोकर इत्यादी उत्पादने मिळतात.

24) महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी फलोद्यान शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते?

उत्तर:

महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक इत्यादी ठिकाणी फलोद्यान शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.

25) शेतीसाठी भूजल कोणकोणत्या प्रकारे मिळवले जाते?

उत्तर:

शेतीसाठी भूजल हे विहिरी, कूपविहिरी, तलाव खणून मिळवले जाते.

26) विस्तृत शेती प्रामुख्याने कोणत्या पिकांचे उत्पादन घेतले जाते?

उत्तर:

विस्तृत शेती प्रामुख्याने गहू, मका व काही प्रमाणात बार्ली, ओट, सोयाबीन या पिकांचे उत्पादन घेतले जाते.

27) पशुपालन व्यवसायात कोणते प्राणी पाळले जातात?

उत्तर:

पशुपालन व्यवसायात गाई, म्हशी, बैल, रेडी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, ससे, एमू, वराह इत्यादी प्राणी पाळले जातात.

28) फलोद्यान शेतीत कोणत्या फळांचे उत्पादन घेतले जाते?

उत्तर:

फलोद्यान शेतीत आंबा, सिताफळ, द्राक्ष, केळी, डाळिंब, ड्रॅगनफ्रूट, चेरी, संत्रे, रासबेरी, स्ट्रॉबेरी, मलबेरी इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते.

29) फुलशेतीत कोणत्या फुलांचे उत्पादन घेतले जाते?

उत्तर:

फुलशेतीत लिली, जरबेरा, शेवंती, झेंडू, निशिगंध, डेलिया इत्यादी फुलांचे उत्पादन घेतले जाते.

30) ग्रामीण व नागरी वस्ती यांचा कायापालट होण्यास कोणते घटक कारणीभूत ठरतात?

उत्तर:

ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट होण्यास आधुनिकता, विज्ञान व तंत्रज्ञान हे घटक कारणीभूत ठरतात.

31) विखुरलेली मानवी वस्ती प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळते?

उत्तर:

विखुरलेली मानवी वस्ती प्रामुख्याने उंचसखल प्रदेश, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट तसेच विस्तृत कृषी क्षेत्र इत्यादी ठिकाणी आढळते.

32) कोणत्या कारणांमुळे नागरी वस्तीचे शहरी वस्तीत रूपांतर होते?

उत्तर:

धार्मिक, ऐतिहासिक, व्यापारी, शैक्षणिक, पर्यटन व प्रशासकीय कारणांनी नागरी वस्तीचे शहरी वस्तीत रूपांतर होते.

33) ग्रामीण वस्तीतील बहुतांश लोक कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुंतलेली असतात?

उत्तर:

ग्रामीण वस्तीतील बहुतांश लोक प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात.

34) ग्रामीण वस्ती म्हणजे काय?

उत्तर:

ज्या मानवी वस्तीतील बहुसंख्या लोकांची मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडित असतात ती वस्ती म्हणजे ग्रामीण वस्ती होय.

35) नागरी वस्तीतील बहुतांश लोक कोणत्या प्रकारच्या व्यवसायांना गुंतलेली असतात?

उत्तर:

नागरी वस्तीतील बहुतांश लोक द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात गुंतलेली असतात.

36) कोणत्या कारणांमुळे शहरांचे महानगरांत रूपांतर होते?

उत्तर:

मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या वाढ व इतर सोयी सुविधांमध्ये वाढ या कारणांमुळे शहरांचे महानगरांत रूपांतर होते.

37) रेषाकृती मानवी वस्ती प्रामुख्याने कोणत्या ठिकाणांलगत आढळते?

उत्तर:

रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा, किनारपट्टीचे प्रदेश, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग इत्यादी ठिकाणी रेषाकृती वस्ती आढळते.

38) समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो?

उत्तर:

समोच्चता दर्शक नकाशाचा वापर पर्यटक, गिर्यारोहक, भटकंती करणारे, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो.

39) समोच्चता रेषा म्हणजे काय?

उत्तर:

नकाशात समान उंचीची ठिकाणी जोडणारी रेषा म्हणजे समोच्चता रेषा होय.

40) एकमेकींपासून दूर असणाऱ्या समोच्चता रेषा कोणत्या स्वरूपाचा उतारा दर्शवतात?

उत्तर:

एकमेकींपासून दूर असणाऱ्या समोच्चता रेषा मंद स्वरूपाचा उतार दर्शवतात.

41) प्रदेशातील भूरूपाची व उंचीचे वितरण कशाच्या सहाय्याने दाखवता येते?

उत्तर:

प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या साहाय्याने दाखवता येते.

42) त्रिमितीय वस्तूचे द्विमितीय चित्र तयार करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो?

उत्तर:

त्रिमितीय वस्तूंचे द्विमितीय चित्र तयार करण्यासाठी गणिती पद्धत, सर्वेक्षण पद्धत इत्यादी पद्धतींचा वापर केला जातो.

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post