गवतफुला रे ! गवतफुला !
 
कवितेमधीलअर्थ  थोडक्यात
       कवितेतील लहान मुलगा माळावर पतंग उडवत असताना त्याला गवतामध्ये रंगीबिरंगी  गवतफुलाने मन मोहून गेले.
  गवत फुला ला पाहून मुलगा पतंग उडवायचे देखील विसरून गेला त्याच्या विविध रंगछटा पाहून मुग्ध झाला .
   गवतफुला च्या रेशमासारखी  पाती निळी निळीशी पाकळी आणि त्यामधून चमचमणारे पिवळे पराग तळाशी पुन्हा एक गोजिरवाणी लाल पाकळी फुलली आहे ते पाहून मुलाचे भान हरपून गेले .
  गवतफुलाचे इवलेसे रूप पाहून वाराही झुला झुलावण्याचा खेळ खेळू लागला .गवतफुला ला पाहून लहान मुलाला वाटते की त्याची गोजिरवाणी भाषा शिकून घ्यावीगवत फुला सारखे कपडे काढून फुलपाखरांची फसगत करावी असे वाटते .

प्रश्न १ .दोन - तीन वाक्यात उत्तरे लिहा .
१)कवितेतील मुलाची गवतफुलाची कुठे व कशी भेट झाली ?
उत्तर -कवितेतील मुलगा मित्रांसोबत पतंग उडवत असताना अचानक त्याने गवतावर डोलणारे एक गोजिरवाणे गवतफुल पाहिले अशाप्रकारे मुलाची गवतफुलांची माळरानावर भेट झाली .

२)गवतफुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला ?
उत्तर - गवतफुलाला पाहूनआकाशातला पतंग विसरला तो सोबतच्या मित्रांना विसरला गवतफुला ला पाहून मुलाचे मन मोहून गेले अशाप्रकारे तो गवत फुलात हरखून गेला .

३)कवित्री ने गवतफुला च्या पानांचे व पाकळ्यांचे  वर्णन कसे केले आहे ?
उत्तर - गवतफुलांची हिरवी नाजुक रेशिम पाती आहेत एक पाकळी आहे .व त्यांचे झगमगणारी पिवळे पराग आहे .गवत फुलाच्या तळाशी एक सुंदर लाल पाकळी खुलली आहे .

४)गवतफुला कसे  होऊन कोण  भेटण्यास येणार  आहे ?
उत्तर - गवतफुला ला भेटायला वारा लहान होऊन झोपाळा खेळायला आला आहे तसेच रात्रही लहान होऊन अंगाई म्हणते आहे .
 मुलालाही वाटते की आपण गवतफुलाहूनही लहान व्हावे व त्यास भेटावे .

५)गवत फुला सोबत राहून मुलाला कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ?
उत्तर - घर शाळा सगळे विसरून मुलाला गवतफुला सोबत रहावेसे वाटते . गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात .खेळ शिकवावेत व जादू शिकवावी आभाळाकडे हट्ट करून त्याच्यासोबत खाऊ खावा . गवतफुला सारखे कपडे घालून फुलपाखरांना फसवावे असे मुलाला वाटते .

प्रश्न २ .पुढे दिलेल्या अर्थाचा कवितेतील ओळी शोधा .
१)तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो .
उत्तर - पाहून तुजला हरवुन गेलो ,अशा तुझ्या रे रंगकळा !

२)मला तुझ्यापेक्षा हि लहान व्हावेसे वाटते .
उत्तर - मलाही वाटे लहान होऊन , तुझ्याहुनही  लहान रे

३)तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्यात .
उत्तर - तुझी गोजिरी शिकून भाषा ,गोष्टी तुजला सांगाव्या .

४)तुझे घालुनी रंगीत कपडे , फुलपाखरा फसवावे !
उत्तर - तुझे घालुनी रंगीत कपडे ,फुलपाखरा फसवावे !

प्रश्न ३ .या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते लिहा .उदा .रेशीम पाती -हिरवी
१)पाकळी - निळी

२)पराग - पिवळे

३)तळीची पाकळी - लाल

प्रश्न ४ .गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा .
प्रश्न ५ .समानार्थी शब्द लिहा .
१)गीत - गाणे

२)रात्र - रजनी

३)आभाळ - आकाश

४)वारा - पवन

प्रश्न ६ .रंगरंगुल्या , सानसानुल्या ,नीळनिळूली . यांसारखे शब्द शोधा व लिहा .
उत्तर - सोनपाकळ्या ,  रंगीबिरंगी ,गोडगोजिरी ,लाजलाजिरी

प्रश्न ७ . ' सळसळ ' यासारखे आणखी शब्द लिहा .
उत्तर - मळमळ ,चळचळ ,खळखळ ,जळजळ ,

3 Comments

THANK YOU

Post a Comment

THANK YOU

Previous Post Next Post